Google Form कसा बनवावा ?

Google Form कसा बनवावा ?

    1.  सर्वांत प्रथम तुम्ही तुमच्या Gmail ने Login करावे. त्यानंतर खालील प्रमाणे Page Open होईल.


    2.  बाणाने दर्शविलेल्या Drive ( ड्राईव्ह) वर क्लिक करावे.


    3.  वर लाल बाणाने दर्शविलेल्या Google Form वर क्लिक करावे.


    4.  त्यानंतर फॉर्मला नाव देण्यासाठी सर्वांत वर असलेल्या Untitled Form वर क्लिक करावे.


    5.  वरील प्रमाणे फॉर्मचे नाव लिहावे व Ok वर क्लिक करावे.


    6.  त्यानंतर वरील प्रमाणे Queation Tital मध्ये पाहिजे असलेला मुद्दा टाकावा व Question Type मध्ये प्रकार निवडावा व Done वर क्लिक करावे.


    7.  त्यानंतर Add Item करुन नवीन मुद्दे टाकावेत. वर असणाऱ्या Insert Tab चा वापर करुन आपण आपला Google Form आकर्षक करु शकता.


    8.  Confirmation Page मध्ये दिल्याप्रमाणे बदल करुन Send Form वर क्लिक करावे.


    9.  त्यानंतर वरील प्रमाणे पेज Open होईल. त्यातील Short URL वा क्लिक करावे. तुमची Link तयार होईल. ती Copy करुन ठेवावी. त्यानंतर Done वर क्लिक करावे.


    10.         त्यानंतर वरील प्रमाणे Google Form तयार होईल.

           त्यात तुम्ही आवश्यक माहिती भरुन घेऊ शकता. त्यासाठी Copy केलेली Link वेबसाईट ब्लॉग ई-मेल फेसबुक व्हॉट्सअॅपने इतरांकडे पाठवू शकता व माहिती भरुन घेऊ शकता. जमा झालेली माहिती आपणांस आपल्या Google Drive मध्ये Excel स्वरुपात मिळते.
             अशा प्रकारे Google Form बनवून माहिती गोळा करण्याचे व संकलन करण्याचे काम अतिशय जलद गतीने होऊ शकते. Google Form मध्ये माहिती भरल्याबरोबर ती Save होऊन त्या माहितीचे एकीकरण Excel मध्ये होणार आहे. त्यामुळे एकीकरणाला काहीच वेळ लागणार नाही.

              तालुक्यावरुन किंवा जिल्ह्यावरुन माहिती मागविल्यास अशाप्रकारचा फॉर्म तयार केला तर नेहमी पेक्षा ¼ वेळेत काम पूर्ण होऊ शकते. असे फॉर्म भरण्यासाठी संगणक व इंटरनेट नसले तरी मोबाईल वरुन हा फॉर्म Online भरता येऊ शकतो व त्यामुळे कार्यालयातील बहुतेक कामे पेपरलेस होतील व कागद बचत होईल.  

No comments:

Post a Comment